सद्य:स्थितीमध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक फुल अवस्थेमध्ये असताना प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा अर्धवट उमलेली फुले आढळून येत आहेत.
त्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्याकिंवा अर्धवट उमलेली फुले वेळीच ओळखून नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रणासाठी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून योग्य उपाययोजना करणे वेळीच शक्य होते.
नुकसानीचा प्रकार व लक्षणे
१ अंड्यातून निघणारी अळी रंगाने पांढरी, तर पूर्ण वाढलेली अळी गुलाबी रंगाची असते.
२ अळी फुले व हिरव्या बोंडाचे नुकसान करते. अळीचा प्रादुर्भाव ज्या फुलांमध्ये होतो ती फुले अर्धवट उमलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात म्हणून त्यांना डोमकळी असे म्हणतात.
अधिक माहितीसाठी क्लिक करा