राज्यातील ऊस सर्व्हेक्षणासाठी उपग्रहाची मदत घेणारा प्रकल्प साखर आयुक्तालयाने सुरु केला आहे .यामुळे कंट्रीम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर करून ऊस स्थितीविषयक अद्यावत माहिती दर महिन्याला संकलित केली जाणार आहे.
राज्यातील ऊस गाळपाचे वेळाप्रत्रक निश्चित करताना उसाचे क्षेत्र व उत्पादकता यांचा अंदाज उपयुक्त ठरतो. याचा अंदाज आकड्यांच्या आधारे गाळप हंगामाचे नियोजन होते. मात्र यापूर्वी अनेकदा क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यांचे अंदाज चुकले आहेत. त्यामुळे राज्य शासनासह आयुक्तालय अडचणीत येते. या समस्येवर उपाय म्हणून साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी उसस्थिती जाणून घेण्यासाठी आता मानवी अंदाजाप्रमाणेच कुत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी पहिल्या टप्यात तीन वर्षासाठी सहा लाख रुपये खर्च करण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा