खतांच्या द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्याचे प्रमाण जास्तीत जास्त असावे. शेतातील तापमानास खते पाण्यात लवकरात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत. खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये.
खतातील क्षारांमुळे गाळण यंत्रणा, ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडू नये तसेच संचातील कोणत्याही घटकावर गंज चढू नये अथवा अनिष्ट परिणाम होऊ नये खते वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत. खताची पाण्यांमध्ये असणाऱ्या क्षारांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये. एका वेळी एकापेक्षा जास्त खते एकत्रित देताना त्याची आपापसात कोणती अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावी ऊस पिकाची अन्नद्रव्याची गरज हि जास्त असते.

https://agrowon.esakal.com/agro-special/nutrient-management-for-sugarcane-through-drip-irrigation-article-on-agrowon

माहिती शेअर करा