यंदा नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर मात करून मिरज पूर्व व कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ झाला आहे. कोंगनोळीतील द्राक्षाची ३०० ते ४०१ प्रति चार किलोस रुपयांनी खरेदी केला जात आहे.
बदलत्या हवामानाचा सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्यामुळे वर्षानुवर्षे द्राक्षबागांचे क्षेत्र कमी होत असताना मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आगाप जुलै- ऑगस्ट महिन्यात छाटण्या घेतलेल्या द्राक्ष बागांचेही मिलीबग्ज, कुजवा, नत्रगाठीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनावर परिणाम झाल्याचे बागायतदारांनी सांगितले.
कोंगनोळी-सलगरेतील येथील बागायतदारांनी आगाप फळछाटणी घेऊन अवकाळी पावसापासून संरक्षण होण्यासाठी बागेवरती प्लास्टिक आच्छादन घालून द्राक्षबागा पिकवण्याचा प्रयत्न असला, तरीपण हवेतील बदलांमुळे द्राक्षावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने महागड्या कीटकनाशकांचा वापर करून चांगला दर मिळवण्यासाठी बागायतदार प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा