जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे उत्पन्न वाढवण्यासाठी AI चा उपयोग केला जातोय. सोयाबीन पिकासाठी AI चा वापर करण्यात येणारा देशातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट धाराशिव जिल्ह्यातील उपळा गावामध्ये साकारण्यात आला आहे.AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक तासाला हवामान आणि शेती विषयक माहिती दिली जात आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे. या प्रकल्पाची शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. काय आहे हा प्रकल्प?

या वेदर स्टेशनच्या चहू बाजूला असलेल्या 20 किलोमीटर परिघातील शेतीच्या नियोजनासाठी या स्टेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जात आहे वेदर स्टेशन प्रत्येक तासाचा वातावरणातील बदलाचा रिपोर्टची राहुरी कृषी विद्यापीठाला होतेय आणि कृषी विद्यापीठातील तज्ञ नोंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं नियोजन कसे करायचं हे थेट मोबाईलवर सांगतात अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक महादेव आसलकर यांनी दिली.

शेतात बसवले सेन्सर, क्षणक्षणाची अपडेट

वेदर स्टेशनच्या जोडीला सॉईल सेन्सरचाही वापर तंत्रज्ञानाच्या पायलेट प्रोजेक्टमध्ये केला जातोय .उपळा गावातील वेगवेगळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये 10 शेतकऱ्यांच्या शेतात असे सॉईल सेन्सर बसवले आहेत, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी राकेश माकोडे यांनी दिली.

रोगाची माहिती अगोदरच मिळणार

पिकाला होणारा पाण्याचा ताण, ओलावा त्यामुळे होऊ शकणारे बुरशीजन्य रोग याची माहिती अगोदरच हे सेंसर द्वारे शेतकऱ्यांना पुरवणार आहे. पिकावर येणारी रोगराई चार दिवस अगोदर या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना समजणार आहे, त्यामुळे येणारा रोग आणि त्यासाठी करायची कीड नियंत्रणाची फवारणी कधी आणि कोणती करायची हे शेतकऱ्यांना कळणार आहे, असे मत शेतकरी धनाजी पडवळ यांनी दिली.

या पायलट प्रकल्पाची देशभरात चर्चा सुरू आहे. या प्रयोगातील बारीक-सारीक नोंदी होत आहे. क्षणाक्षणाची डिजिटल रेकॉर्ड असतील. एका गावातील हा प्रयोग देशाच्या कृषीक्षेत्रासाठीच नाही तर अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा बदल घडवणारा असेल. शेतीतील सुधारणांना यामुळे गती येईल. अभिनव पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा होईल, असे मानले जात आहे. या प्रयोगाच्या यशस्वीनंतर देशातील अनेक भागातील शेतीत एआयचा वापर वाढणार आहे.


https://www.tv9marathi.com/agriculture/use-of-ai-in-soybean-production-countrys-first-pilot-project-in-dharashiv-1453082.html

माहिती शेअर करा