ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराचे तंत्र राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट (व्हीएसआय) आणि अग्रीकल्चर डेव्हलोपमेंट ट्रस्ट (एडीटी), बारामती यांच्यामध्ये सामंजस्य करार होणार आहे.
या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून राज्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. ‘व्हीएसआय’च्या मांजरी बुद्रुक येथील मुख्यलयात सकाळी ११ वाजता ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/ai-revolution-in-sugarcane-farming-vsi-and-adt-join-hands-mj18#goog_rewarded

माहिती शेअर करा