राज्यात पावसाने उघडीप देताच उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. कमाल तापमान चाळीशीपार असल्याने विदर्भ भाजून निघत आहे आज सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कमाल तापमान वाढल्याने पारा चाळीशीपार गेला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४ २ अंश तापमानाची नोंद झाली. वर्धा ब्रह्मपुरी येथे ४३ अंशापेक्षा अधिक भंडारा, गोंदिया,अमरावती येथे ४२ अंशापेक्षा अधिक तर अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, जळगाव येथे पारा चाळीशीपार होता तर मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

https://agrowon.esakal.com/weather-news/chance-of-heavy-rain-rat16

माहिती शेअर करा