चीनमधून बेकायदेशीररित्या आलेला बेदाणा देशातील विविध बाजारपेठांत विक्रीस पोहोचला आहे. परिणामी, बेदाण्याच्या दरात गेल्या आठवड्यात प्रति किलो ३० रुपयांची गेल्या वीस दिवसांत ६० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी झळ बसलीआहे.
येत्या पंधरा दिवसांतही बेदाण्याची आवक वाढू शकते, असा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे. बेकायदेशीर येणारा बेदाणा थांबला नाही तर दर कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यापूर्वी बेदाण्याची आवक किती झाली, याचा नेमका अंदाज नसल्याने दर टिकून राहतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो अंदाज फोल ठरला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चीनच्या बेदाण्याची आवक सुरू आहे. यामध्ये कायदेशीर बेदाणा फक्त १७५ टन आला असल्याचा दावा द्राक्ष संघाने व्यक्त केला आहे. असे असताना बेदाण्याचे दर कमी का झाले असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. परंतु बेकायदेशीर बेदाण्याची आवक ५ हजार टन झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या मुंबईसह अन्य राज्यांत बेदाणा विक्रीसाठी पोहोचला असल्याने
जुलै महिन्याच्या मध्यापासून ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बेदाण्याचे दर दोन वेळा कमी झाले आहेत. अर्थात, पंधरा ते वीस दिवसांत प्रति किलोस ६० रुपयांनी दर कमी झाले आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. सध्या चीन आणि इराक या दोन देशांतील बेदाणा भारतात कायदेशीररीत्या आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.