शेतीला आधुनिक तंत्रज्ञान वापरुन पाणी बचतीस चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी ९७ हजार रुपये आणि तुषार सिंचनासाठी ४७ हजार रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे.

हे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत ‘टॉप अप’ स्वरूपात असून, इतर योजनांचा लाभ घेतल्यानंतरच शेतकऱ्यांना अतिरिक्त स्वरूपात मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम प्रति थेंब अधिक पीक योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा लाभ घेणे आवश्यक असणार आहे.

योजनेचा उद्देश

या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे आधुनिक सिंचन पद्धती वापरून पाणी वाचवणे, त्याचबरोबर पिकाचे उत्पादन वाढवून शेतीत जास्त नफा मिळवणे हा आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/how-to-apply-for-drip-and-sprinkler-irrigation-subsidy-in-maharashtra-rat16

माहिती शेअर करा