राज्यातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना पाईप खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. सरकारकडून हे अनुदान महाडीबीटीच्या माध्यमातून दिले जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या १००% किंवा ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. या दोन्हीपैकी जे कमी असेल, तेच लाभार्थ्यांना दिले जाईल.

योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचे मुख्य शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनात वाढ करणे आणि आर्थिक स्वावलंबन साधणे हा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सिंचन साधनांवरील खर्च कमी होईल आणि त्यांना शाश्वत शेती पद्धतींचा फायदा मिळेल.

https://agrowon.esakal.com/agro-special/how-to-apply-for-irrigation-pipe-subsidy-in-maharashtra-rat16

माहिती शेअर करा