राज्य सरकारने शेतकरी व पशुपालकांसाठी जनावरांच्या चाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना २ एचपी विद्युतचलित कडबा कुट्टी मशीन खरेदीसाठी ५० टक्के अनुदान मिळत आहे. तसेच, या मशीनमुळे जनावरांचा चारा सहज आणि जलद तयार होईल, शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि कष्टही कमी होण्यास मदत होईल.

योजनेचा उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना हाताने चारा कापण्याच्या त्रासातून मुक्त करणे हा आहे. हाताने चारा कापताना वेळ, मेहनत आणि दुखापतीचा धोका वाढतो. मशीनमुळे शेतकरी चारा जलद व सुरक्षितरीत्या कापू शकतो, ज्यामुळे वेळ आणि कष्टाची बचत होईल.

https://agrowon.esakal.com/agro-special/how-to-apply-online-application-for-kadba-cutter-machine-mahadbt-rat16

माहिती शेअर करा