भारतातील शेतकऱ्यांसाठी खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. कारण चीनने केवळ महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी केली नसून भारतात पाठविण्यात येणाऱ्या युरिया आणि डीएपी खतांचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात घटवला आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

खतांच्या आयातीत मोठी घट

अधिकृत आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात चीनकडून 1.65 लाख टन युरिया आयात झाले होते. मात्र 2024-25 मध्ये ही आयात मोठ्या प्रमाणात घटून एक लाख मेट्रिक टनांपेक्षा कमी झाली आहे. एकूण युरिया आयात देखील 71.04 लाख टनांवरून 56.46 लाख टनांवर आली आहे.

भारतामध्ये युरियाची मागणी दरवर्षी वाढत असून, 2023-24 मध्ये 357.80 लाख टनांवरून 2024-25 मध्ये 387.92 लाख टनांवर पोहोचली आहे. त्यामुळे पुरवठा आणि मागणी यामध्ये मोठा तफावत निर्माण झाला आहे.

https://news18marathi.com/agriculture/china-has-stopped-the-supply-of-fertilizers-which-will-have-major-impact-on-indian-farmers-1460359.html

माहिती शेअर करा