राज्य सरकारने दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी व्याजावर कर्ज मिळते. एक शेतकरी या योजनेत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो, जे फलोत्पादन, सुशोभीकरण, अन्नधान्य उत्पादन किंवा इतर कृषी व्यवसायासाठी वापरता येते.


या कर्जामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांचा स्वतःचा सहभाग ५ टक्के, राष्ट्रीय महामंडळाचा (NHFDC) सहभाग ९० टक्के, आणि राज्य महामंडळाचा सहभाग ५ टक्के असतो. कर्जावरील व्याजदर पुरुष अर्जदारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत ६ टक्के आणि त्यापुढील रकमेसाठी ७ टक्के वार्षिक आहे. तर महिला अर्जदारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ५ टक्के आणि त्यापुढील रकमेसाठी ७ टक्के वार्षिक व्याज आकारले जाते.

https://agrowon.esakal.com/agro-special/government-loans-up-to-rs-10-lakh-for-agriculture-rat16

माहिती शेअर करा