अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू केल्याने कापड, कोळंबी, हिरे व सोन्याचे दागिने, चमड्याच्या वस्तू, सोयापेंड, फळे व भाजीपाला निर्यात उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. देशात हे उद्योग सर्वाधिक रोजगार देणारे असल्याने लाखो लोक बेरोजगार होण्याची चिन्हे आहेत. या संकटातून दिलासा मिळण्यासाठी उद्योगांनी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. तर सरकारही २५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ८ हजार ६५० कोटी डाॅलर्सच्या वस्तूंची निर्यात केली होती. मात्र २०२५-२६ मध्ये ही निर्यात ५ हजार कोटींवरच स्थिरावण्याचा अंदाज आहे. कापड, कोळंबी, चमड्याच्या वस्तू, हिरे व सोन्याची दागिने यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारताची निर्यात कमी झाल्यानंतर या वस्तूंची चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तान, मेक्सिको आणि इक्वेडोरमधून अमेरिकेला निर्यात वाढणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/50-us-import-duty-hits-indian-textile-and-seafood-industry-rat16

माहिती शेअर करा