१९ जुलै १९६९ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी १४ मोठ्या खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. यामुळे बँकिंग खेडेगावी तसेच मागास भागात जाऊन पोहचले बँका ज्या तोपर्यंत तारण बघून कर्ज देत होत्या, त्या आता कारण बघून कर्ज देऊ लागल्या. बँका तोपर्यंत पत असणाऱ्यांना कर्ज देत होत्या, त्या आता सामान्य माणसाजवळ पत निर्माण करण्यासाठी कर्ज देऊ लागल्या. गरिबी निर्मूलन, रोजगार निर्मिती, शेतीचा विकास या राष्ट्राच्या प्राथमिकता ! राष्ट्रीयीकरणानंतर भारतीय बँकिंगच्या प्राथमिकता बनल्या यामुळे सावकारी नष्ट झाली, हरितक्रांती शक्य झाली, देश अन्नधान्यांच्या बाबतीत स्वावलंबी बनला.
अधिक माहितीसाठी क्लिक करा