अमेरिकेने भारतावर भरमसाठ आयातशुल्क (टॅरिफ) लादले. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दबावतंत्राचा वापर केला. पण भारताने या दबावाला न जुमानता रशियासोबत द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांच्यात शुक्रवारी दिल्लीतील कृषी भवन येथे उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी भारत आणि रशिया यांच्यात द्विपक्षीय कृषी क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करणे आणि व्यापार वाढविण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली.

उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यात विशेषतः कृषी क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. भारतातून रशियात कृषी उत्पादनांची निर्यात वाढवणे, बाजारपेठेत प्रवेश अधिक सुलभ करणे. तांत्रिक आणि संशोधन भागीदारीसाठी नवीन संधींचा शोध घेणे, हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. रशियाच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना, कृषिमंत्री चौहान यांनी, दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास आणि समजुतीवर आधारित मजबूत द्विपक्षीय भागीदारीचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी बोलताना कृषी क्षेत्रातील भारताच्या प्राधान्यांवर भर दिला. त्यात अन्न सुरक्षेबाबत सुनिश्चितता, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि सर्व नागरिकांना सुरक्षित, पोषक अन्न पुरवठा या मुद्यांचा समावेश होता.

https://agrowon.esakal.com/agro-special/india-and-russia-boost-agricultural-trade-ddb79

माहिती शेअर करा