पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नुकतीच देशाला पहिली सेमीकंडक्टर चिप समर्पित करण्यात आली. सेमीकंडक्टर चिप प्रत्यक्षात एक लहान कीबोर्ड असतो जी सिलिकॉन आधारित डिव्हाईसवर फीट केली जाते. त्यात अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात. शेतकऱ्यांसाठी ती कशाप्रकारे फायद्याची ठरू शकतो आणि ती देशाच्या कृषी क्षेत्रात कसा बदल घडवू आणू शकते?, ते आपण जाणून घेऊ.

सेमीकंडक्टर चिप शेती आणि शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. स्मार्ट सिंचन, पिकाची देखरेख आणि हवामानाचा अंदाज यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानातील त्याच्या वापरामुळे कृषी क्षेत्राचे चित्र बदलू शकते. भारतात सध्या शेतीपिकांसाठी एआय (AI) चा वापर करण्याचे प्रयोग केले आहेत. अशा परिस्थितीत सेमीकंडक्टर निश्चितच कृषी क्षेत्रात बदल घडवून आणू शकते.

शेतकऱ्यांना होणार मदत

शेत पिकांसाठी योग्य प्रमाणात पाण्याचा अंदाज बांधणे अवघड जाते. कधी पिकाला कमी पाणी पुरवठा होतो तर कधी अधिक प्रमाणात सिंचन होते. परिणामी त्याचा पीक उत्पादनावर परिणाम होतो. पण आता सेमीकंडक्टर चिप आधारित सेन्सरमुळे शेत जमिनीच्या मातीतील ओलावा मोजण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांना पिकाला किती पाणी द्यावे? याचा अंदाज बांधता येईल. यामुळे पाण्याची बचत होईलच आणि त्याचबरोबर पीक उत्पादनही वाढेल. विशेषतः हे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त भागात खूप उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

https://agrowon.esakal.com/techno-wan/pm-modi-dedicates-indias-first-semiconductor-chip-to-the-nation-mj18

माहिती शेअर करा