खानदेशात पीक कर्ज वितरण खरिपासाठी सुरू आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँका हे कर्ज देण्यासंबंधी हात आखडता घेत आहेत. जिल्हा बँकांनी मात्र आपले पीक कर्ज वितरण गतीने केले आहे. धुळे – नंदुरबार जिल्हा बँक, जळगाव जिल्हा बँकेने खरिपासाठी पीक कर्ज वितरण लक्ष्यांक निश्चितीनंतर प्रस्ताव वेगात स्वीकारले व कर्ज वितरण सुरू केले. जळगाव जिल्हा बँकेला यंदा सुमारे एक हजार ५० कोटी रुपये पीक कर्ज वितरण सप्टेंबर २०२४ पर्यंत करायचे आहे.

धुळे – नंदुरबार जिल्हा बँकेला सुमारे २४१ कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे आहे. या दोन्ही बँकांनी लक्ष्यांकातील १०० टक्के पीक कर्ज वितरण जवळपास पूर्ण केले आहे. मे महिन्यातच या बँकांनी ७५ ते ८० टक्क्यांवर पीक कर्जाचे वितरण केले. जळगाव जिल्हा बँकेने मागील वेळेस एक लाख ९० हजार शेतकऱ्यांना सप्टेंबर २०२४ पर्यंत पीक कर्ज वितरण लक्ष्यांक गाठला होता. यंदाही पीक कर्ज या बँकेने जोमात केले.

राष्ट्रीयीकृत बँका मागे

खानदेशात राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वितरण संथगतीने केले आहे. मागील वेळेस रब्बीतही ८० टक्केच पीक कर्ज वितरण झाले होते. गेल्या खरिपातही गती संथ राहीले. पीक कर्ज वितरण प्रशासनाने निश्चित केलेल्या लक्ष्यांकाएवढे वितरित झालेले नाही, अशी स्थिती आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/district-banks-lead-crop-loan-distribution-in-khandesh-nationalized-banks-lag-mj18

माहिती शेअर करा