देशात ऑक्टोबर महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज आहे. परंतु उत्तर-पश्चिम भागासह दक्षिण द्विपकल्पीय राज्यातील काही भाग आणि ईशान्य भारतात एक दोन ठिकाणी सामान्य पावसाची शक्यता आहे, असा अंदाज आहे. ऑक्टोबर तसेच मॉन्सूनत्तर पावसाच्या अंदाजासह तापमानाचा दीर्घकालीन अंदाज मंगळवारी (ता.३०) हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे.

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार हजेरी लावली आहे. सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विर्दभात काही भागात पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दक्षिण द्विपकल्पीय प्रदेशात जसे की, तमिलनाडू, पुडुचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशची आणि यनमची किनारपट्टीसह केरळ माहे आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या ११२ टक्के अधिक पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे.

https://agrowon.esakal.com/weather-news/india-likely-to-receive-115-rainfall-of-normal-in-october-2025-imd-forecast

माहिती शेअर करा