कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (ए आय) तंत्रज्ञानाचा ऊसशेतीत प्रभावी वापर करत बारामती केव्हीकेत हा प्रयोग यशस्वी केला, पण हे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रात व्यापकस्तरावर पोहचण्यासाठी राष्ट्रीय साखर कारखाना संघ, राज्य साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, ‘विस्मा’ यासारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन एखादा मोठा कार्यक्रम हाती घेतल्यास येत्या ३ ते ४ वर्षात महाराष्ट्रात ऊस उत्पादनात क्रांती होईल, असा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केला आहे.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ‘विस्मा’ आणि बारामती येथील ऍग्रीकलचर डेव्हलोपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी श्री पवार बोलत होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/ai-revolution-in-sugarcane-farming-sharad-pawar-advocates-expansion

माहिती शेअर करा