सद्यःस्थितीत शेत जमिनी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत असून सुपीक माती शेतात्तून वाहून जात आहे. जमिनीचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी उपाययोजना आणि जमिनीचे आरोग्य आणि सुपीकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे. त्याबरोबरच सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा, पिकांचे अवशेष जमिनीत गाडून कुजवावेत आणि जिवाणू संवर्धकांचा वापर करावा, असे प्रतिपादन मृदा शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. योगेश पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी (ता. मालेगाव) येथे मृद विज्ञान विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक मृदा दिन कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी व्याख्याते म्हणून डॉ. पाटील यांनी ‘जमीन आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. संकुलाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार नांदगुडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, तंत्र अधिकारी संतोष गाढे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सोमनाथ सोनवणे, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. विवेक कानवडे, शेतकरी रवींद्र खैरनार यांची विशेष उपस्थिती लाभली.

https://agrowon.esakal.com/agro-special/soil-degradation-rising-in-nashik-experts-call-for-immediate-soil-health-measures-sai29

माहिती शेअर करा