पिकांची लागवड केल्यानंतर त्यांच्या सिंचनाची व्यवस्था करण्याची लगबग सुरु होते. पिकांना पाणी देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या किंवा डिजेलवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीचा वापर करावा लागतो. परंतु गावात विजेचा पुरवठा अनियमित असतो शिवाय विजेचा खर्चही होतो. यासगळ्यावर सौर उर्जेवर चालणारी सिंचन प्रणाली हा चांगला आणि फायदेशीर उपाय ठरु शकतो.
पारंपरिक सिंचन प्रणालीशी तुलना
सौर उर्जेची सिंचन प्रणाली ही डिजेल इंजिन आणि विजेवर चालणाऱ्या उर्जेसारखीच असते. परंतु सौर ऊर्जा या दोन्ही पद्धतीपेक्षा स्वस्त असते. तसेच या दोन्ही पद्धतींचे तोटेसुद्धा तुलनेने जास्त असतात. विकसनशील देशांमध्ये विद्युत ऊर्जा फायदेशीर ठरत नाही कारण गावामध्ये कधीच वेळेवर वीज मिळत नसते. त्यामुळे शेतीची कामे विस्कळीत होतात, शिवाय केवळ रात्रीची वीज असल्यावर शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकाला पाणी देण्यासाठी जातात. त्यामुळे सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी वरदान आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/allow-export-of-ethanol-with-subsidy-rat16