सध्याच्या काळात शेतकऱ्यांचा जैविक उत्पादने वापराकडे कल वाढत आहे. तसेच ऊती संवर्धित रोपांनाही मागणी आहे. या बाबी लक्षात घेत ‘महाबीज’ने शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी मुंबईच्या डॉ. भाभा आण्विक संशोधन केंद्रासोबत करार केला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना पाच अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मुंबईत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हे तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

या हस्तांतरणात म्यूटेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकसित जैविक बुरशीनाशक ‘ट्रायकोडर्मा व्हायरेन्स’, वेस्ट डिकंपोजर, कडुनिंबावर आधारित जैव कीटकनाशक, मातीतील सेंद्रिय कर्ब परिक्षण तंत्रज्ञान आणि ऊती संवर्धन आधारित केळी प्रोटोकॉल या पाच महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांचा समावेश आहे. हस्तांतर करारावर तंत्रज्ञान हस्तांतर प्रमुख डॉ. डॅनियल बाबू आणि ‘महाबीज’मार्फत महाव्यवस्थापक (गुणनियंत्रण व संशोधन) डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या कार्यक्रमाला ‘महाबीज’च्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती बुवनेश्वरी एस., बार्कचे सहयोगी संचालक डॉ. हसन, नाभिकीय कृषी व जैव प्रौद्योगिकी विभागाचे अध्यक्ष डॉ. आनंद बल्लाळ प्रमुख उपस्थित होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/barcs-technology-will-be-brought-to-farmers-rat16

माहिती शेअर करा