जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२५ साठी कृषी विभागातंर्गत राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पीके योजनेअंतर्गत हरभरा, ज्वारी, गव्हाचे मिळून एकूण ४ हजार ४४५ क्विंटल प्रमाणित बियाणे अनुदानावरील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. महाबीजच्या जिल्ह्यातील अधिकृत वितरकांमार्फत ७/१२ उताऱ्यांच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात येत आहे. अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी सांगितले.
प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक साहाय्य प्रति शेतकरी किमान २० गुंठे ते कमाल १ हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in यावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.परभणी जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य अंतर्गत हरभऱ्याच्या १० वर्षाआतील वाणाचे १ हजार ५८० क्विंटल बियाणे वितरणाचा लक्ष्यांक असून प्रतिक्विंटल ५ हजार रुपये तर १० वर्षावरील वाणांचे १ हजार १३३.७० क्विंटल बियाण्याचा लक्ष्यांक असून प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपये अनुदान आहे. असलेल्या सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक पोटहिश्शाच्य मोजणीसाठी केवळ २०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.