दर वर्षी ‘अर्ली’ द्राक्षांचे ऑक्टोबरअखेर हंगामातील खुडे सुरू होऊन दिवाळीनंतर प्रत्यक्ष निर्यातीला गती येते. मात्र यंदा आठवडाभर उशिराने निर्यात सुरू झाली आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे अडचणी वाढल्याने मालाची उपलब्धता कमी असल्याने निर्यात ५० टक्क्यांनी कमी आहे. उपलब्ध द्राक्षांची दुबई, सौदी अरेबिया व रशियामध्ये निर्यात होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरात तेजी आहे. प्रतिकिलो १५० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळत असून आत्तापर्यंतच्या इतिहासात हे उच्चांकी दर नोंदविले गेले आहेत.

यंदा प्रतिकूल वातावरण आणि अतिवृष्टीचा सामना करत बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ली द्राक्ष उत्पादन घेतले. सुरुवातीच्या टप्प्यात ऑक्टोबरअखेरीस खुडे सुरू झाले. त्यावेळी उत्तर भारतात दिल्ली, जयपूर, लखनौ या बाजारपेठेत द्राक्ष गेली. नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहात निर्यातीला मुहूर्त लागला. त्यानुसार हे कंटेनर आता रवाना होत आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मालाची उपलब्धता वाढण्यास सुरुवात होईल. पुन्हा जानेवारीपासून ते पुढे फेब्रुवारीच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत मालाची आवक पुन्हा मंदावण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारीनंतर पुन्हा हंगाम सुरळीत होईल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/maize-prices-crash-in-maharashtra-govt-starts-msp-procurement-at-45-centers-sai29-2

माहिती शेअर करा