समुद्रमार्गे इंग्लंडला आंबा निर्यात करण्याचा प्रयोग यंदा महाराष्ट्रातून एप्रिल-मे महिन्यांमध्ये सुमारे २८ वर्षांनंतर केला जाणार आहे. लखनऊ येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर(सीआयएसएच), अपेडा व महाकेसर आंबा बागायतदार संघ तसेच केबी एक्स्पोर्ट यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे, अशी माहिती महाकेसर आंबा बागायतदार संघाचे तज्ज्ञ संचालक व उपाध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली.

‘सीआयएसएच’चे संचालक डॉ. दामोधरण के. बी. एक्स्पोर्टचे प्रमुख प्रकाश खख्खर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौशल्य खख्खर, महाकेसर आंबा बागायतदार संघाचे तज्ज्ञ संचालक व उपाध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे आदी सहभागी झाले होते. केसर आंबा बागा तसेच उत्पादनाची स्थिती याविषयी सविस्तर चर्चा या ऑनलाइन बैठकीत झाली. चर्चेअंती हंगामात महाराष्ट्रातील केसर आंबा एप्रिल-मे महिन्यात समुद्रमार्गे इंग्लंडला पाठविण्याचा निर्णय झाला. यात अपेडाचाही सहभाग असेल, अशी माहिती श्री. कापसे यांनी दिली.

https://agrowon.esakal.com/agro-special/after-28-years-india-to-export-mangoes-to-england-via-sea-route-again-sai29

माहिती शेअर करा