तेल कंपन्यांनी साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॅालची मागणी धान्य आधारित इथेनॅालपेक्षा कमी नोंदवल्याने साखर उद्योगाला तारण्यासाठी केंद्राने अनुदानासह इथेनॅाल निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी उद्योगाकडून होत आहे.
केंद्राने गेल्या चार पाच वर्षांमध्ये इथेनॅाल निर्मितीला बळ मिळावे यासाठी इथेनॉल प्रकल्पांना परवानगी दिली. परवाने व आर्थिक बाबींमध्ये सुलभता ठेवली, यामुळे देशात सुमारे एक हजार प्रकल्प उभारणीसह उत्पादनाच्या पातळीवर कार्यरत आहेत. साखरेच्या दरात सातत्य नसल्याने साखर कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प संजीवनी देणारे ठरत आहेत.
इथेनॉल उत्पादनात महत्त्वाचा वाटा असूनही तेल कंपन्यांनी धान्य आधारित इथेनॉलला पसंती दाखवली आहे. यामुळे तयार होणारे इथेनॉल विकायचे कोठे, असा प्रश्न साखरेवर आधारित प्रकल्पांपुढे आहे. केंद्राने हे प्रकल्प फायद्यात चालावेत यासाठी खास धोरण तयार करावे. इथेनॉल निर्याताला परवानगी द्यावी, लिटरला पाच रुपयांपर्यंत निर्यात अनुदान दिल्यास कारखाने इथेनॉल निर्यात करू शकतील.
https://agrowon.esakal.com/agro-special/allow-export-of-ethanol-with-subsidy-rat16