यंदाच्या खरिपातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी गुरुवारपासून (ता. ३०) नोंदणी सुरू होणार असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली. तसेच बारदान्याअभावी फजित होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेतली आहे. पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबविणार असून यंदा तुटवडा भासणार नाही यासाठी आम्ही दक्ष आहोत, असेही ते म्हणाले.

मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे, या सोयाबीनला जागतिक पातळीवर मागणी आहे. त्यामुळे येथे भावांतर योजना राबविण्याची गरज नाही. येथे उच्चांकी खरेदी होईल, असा दावाही मंत्री रावल यांनी केला. या वर्षी सोयाबीन १८ लाख ५० हजार टन, मूग ३ लाख ३० हजार आणि उडीद ३२ लाख ५६ हजार क्विंटल खरेदीसाठी केंद्र सरकारने मान्यता आहे.श्री. रावल म्हणाले, ‘‘मागील वर्षी महाराष्ट्रात ११ लाख २१ हजार टन सोयाबीन खरेदी केली होती. यंदा महाराष्ट्रात ७५ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. आम्ही केंद्र सरकारकडे २० लाख टन खरेदीचा प्रस्ताव दिला होता.

https://agrowon.esakal.com/agro-special/soybean-procurement-from-november-15-marketing-minister-rawal-registration-from-today-rat16

माहिती शेअर करा