जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील शेतकरी हा दर्जेदार व निर्यातक्षम केळी पिकवत असला तरीही तो स्वतः निर्यात करू शकत नाही. हि समस्या ओळखून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या निर्यातीला मदत करण्यासाठी डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काम करत आहे.

या कंपनीने पहिल्या वेळी कंटेनर सोमवारी आखाती देशात पाठविण्यात आला. केळी उत्पादक शेतकरी सीमा व विजय थोरात या केळी निर्यातदार दांपत्यांच्या हस्ते गणेश पूजन, करून फिट कापण्यात आली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, सह्याद्री फार्मर्सचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन महादेव वाघ, अखीय भारतीय संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, अजय बेल्हेकर, सुनील वामन, मनोज वामन, रवींद्र थोरात, उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा