नैरोबी – इंटरनॅशनल फ्लॉवर ट्रेड एक्झिबिशन (IFTEX) २०२५ या तीन दिवसांच्या प्रदर्शानात केनियाच्या फुलशेती उद्योगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे भव्य प्रदर्शन नैरोबी येथील व्हिसा ओशवाल सेंटरमध्ये पार पडले. यंदा प्रदर्शनाला विक्रमी प्रतिसाद मिळाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत प्री-नोंदणी २५% ने वाढली होती. यामध्ये १८ देशांतील १८९ प्रदर्शकांनी आपली फुलांची विविध प्रकारची झाडे व तंत्रज्ञान सादर केली.
या प्रदर्शनात शेतकरी, पुरवठादार, खरेदीदार, फुलविक्रेते आणि फुलप्रेमी एकाच मंचावर आले होते, त्यामुळे संपूर्ण वातावरण आनंददायी व प्रेरणादायी होते. केनिया हा फुलांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात एक महत्त्वाचा भाग असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. यावेळी सेंद्रिय तंत्रज्ञानाचा वापर आणि नव्या प्रकारच्या फुलांची ओळखही उपस्थितांना करून देण्यात आली.
या प्रदर्शनादरम्यान अनेक प्रतिनिधींनी एकमेकांशी व्यवसायविषयक चर्चा केल्या, कल्पना शेअर केल्या आणि फुलशेतीतील नव्या संधींचा वेध घेतला. युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिका येथील खरेदीदारांनी केनियन फुलांची गुणवत्ता पाहून विशेष रस दाखवला. एकूणच या प्रदर्शनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की केनिया जागतिक फुलशेती बाजारपेठेत आपली भक्कम भूमिका बजावत आहे.