केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर – चाचणी संहिता’ नावाचे नवीन भारतीय मानक जारी करण्यात आले. भारतीय मानक ब्युरोकडून (BIS) शेतीसाठीच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेसाठी एकसमान चाचणी प्रक्रिया निश्चित करण्याच्या उद्देशाने हे मानक विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमधून शेतात मोठा आवाज आणि धूर निघणार नाही. तसेच याचा देखभाल खर्चही खूप कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी हा फायद्याचा मानला जात आहे.

शेती कामासाठीच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये डिझेल इंजिनच्याऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्सचा वापर करण्यात येतो. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतातील विविध कामे करता येतात. डिझेल इंजिनवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचा मोठा आवाज येतो आणि त्यातून धूरही निघतो. पण इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमधून शेतात थेट होणारे धूर वायू उत्सर्जन होत नाही. यामुळे इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारा धोका कमी होतो. तसेच हे ट्रॅक्टर खूप कमी आवाजात काम करतात. यात डिझेल इंजिनांच्या तुलनेत यंत्रातील चलित भाग कमी असतात. त्यामुळे त्यांचा देखभाल आणि संचालन खर्च कमी होतो. तसेच डिझेलचा वापर कमी झाल्यामुळे इंधनाशी संबंधित नैसर्गिक संसाधनांचाही वापरही कमी प्रमाणात होतो.

https://agrowon.esakal.com/agro-special/new-test-code-for-electric-tractors-what-changes-and-benefits-for-farmers-ddb79

माहिती शेअर करा