हवामानावर आधारित संत्रा फळपीक विमा योजना २०२४–२५ अंतर्गत आंबिया बहार संत्रा पिकाच्या विमा परताव्यासाठी तब्बल सात महिने प्रतीक्षा करावी लागलेल्या अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ३,०१५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १७ कोटी २६ लाख ८८ हजार ११० रुपये थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात आले आहेत.

मोर्शी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन करत शासन व विमा कंपनीचे लक्ष वेधण्यात आले. तसेच १४ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.

https://agrowon.esakal.com/agro-special/insurance-refund-of-rs-17-crore-to-orange-growers-rat16

माहिती शेअर करा