पीकविमा घेऊनही जाचक अटींमुळे तो मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी पीकविम्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदाच्या अंबिया बहरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ ६ हजार ६५ एकरांवरच पीकविमा घेतला आहे.

जिल्ह्यात तब्बल एक लाख एकरांवर द्राक्ष पीकाचा विस्तार झाला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या जोखमीसमोर शेतकरी असुरक्षित आहे. त्यामुळे प्रधानमंत्री फळ पिक विमा शासनाने सुरु केली आहे. शेतकरी विमा घेत पिकाला संरक्षित करतात. मात्र, पीक विमा घेतला तरी जाचक अटीमुळे नुकसान होऊन देखील भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविम्याकडेच पाठ फिरवली आहे. यंदाच्या अंबिया बहरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ ६ हजार ६५ एकरावरच विमा घेतल्याचे चित्र आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/grape-growers-turn-their-backs-on-crop-insurance-rat16

माहिती शेअर करा