पारंपारिक शेतीमध्ये बियाणे, माती, पाणी, खते, कीटकनाशके, प्राणीय तथा मानवीय शक्ती इत्यादी वापरून विविध उत्पादने घेतली जातात. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीमध्ये याबरोबरच रोबो, ड्रोन, ट्रॅक्टर चलित विविध सुधारित अवजारे, स्वयंचलित पंप/ विविध उपकरणे यांचा वापर केला जातो. आजमितीला देखील भारतीय शेतीमध्ये कमी ऊर्जा स्रोत – कमी उत्पन्न हे चित्र दिसून येते.

हे स्वरूप बदलण्यासाठी ‘इलेक्ट्रो कल्चर’ तंत्रज्ञान आधारित शेती उपयोगी पडू शकते.  इलेक्ट्रो कल्चर या तंत्रज्ञानाबद्दल विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. इलेक्ट्रो कल्चर शेती म्हणजे वातावरणीय ऊर्जेचा वनस्पती वाढीस तसेच जास्त उत्पन्नास चालना देण्यासाठी वापर करणे. सध्याच्या प्रदूषणावर मात करण्याची ताकद या तंत्रज्ञानामध्ये आहे. खत, कीटकनाशके यांचा कमीत कमी वापर करून वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी इलेक्ट्रिकल्चर तंत्रावर आधारित शेती महत्त्वाची ठरते.

शाश्वत शेती अंतर्गत आपल्या विद्यमान गरजा पूर्ण करतानाच संसाधनांचे संरक्षण, पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन शेतकऱ्यांसाठी आर्थिक व्यवहार्यता ‘इलेक्ट्रो कल्चर’द्वारे सुनिश्चित करणे शक्य आहे. पीक फेरपालट, सेंद्रिय शेती, संवर्धन मशागत आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन यासारखे तंत्र याचे आधारस्तंभ आहेत. यावरच विद्युत ऊर्जेचा ठरावीक पद्धतीने वापर करता येतो.

https://agrowon.esakal.com/techno-wan/use-of-electroculture-technology-in-agriculture-article-on-agrowon-rat16

माहिती शेअर करा