राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्षांचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी नव्या वर्षात ‘संवाद सेतू’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानुसार कृषी अधिकारी आठवड्यातून दोन दिवस बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधतील. दुसऱ्या बाजूला गावपातळीवरील आठ हजार कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयासाठी जागा, लॅपटॉप व फर्निचर पुरविले जाणार आहे.

कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे व कृषी संचालक रफिक नाईकवाडी (विस्तार व प्रशिक्षण) यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला येतो आहे. कृषी विभागाकडे २७ हजार मंजूर मनुष्यबळ आहे. त्यापैकी १९ हजार पदे भरलेली असून यातील १३५०० अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रिय पातळीवर उपलब्ध आहेत. प्रशासकीय कामकाज गुंतलेले अधिकारी वगळता सहायक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी मिळून ८६०० मनुष्यबळ गावपातळीवर प्रत्यक्ष उपलब्ध आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/samvad-setu-to-be-built-between-farmers-and-the-agriculture-department-rat16

माहिती शेअर करा