भारत आणि अमेरिकेतील व्यापारी मुद्द्यावरून तणावाची स्थिती अद्याप निवळली नाही. अलीकडे भारत अमेरिकेत कमी दरात तांदळाची निर्यात करत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. परंतु या आरोपाला आता भारताने फेटाळून लावले आहे.

आरोप फेटाळले

अमेरिकेला होणारी तांदळाची निर्यात प्रामुख्याने प्रीमियम दर्जाच्या बासमती तांदळाची असून या तांदळाचे दर बिगर बासमती तांदळाच्या तुलनेत अधिक असतात, असे भारताने स्पष्टीकरणात सांगितले आहे. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर अतिरिक्त आयात शुल्क अर्थात टॅरिफ लावण्याचा इशारा दिला. तसेच भारत अमेरिकन बाजारात तांदळाची कमी दरात विक्री करत असल्याचा आरोप केला. या आरोपांना उत्तर देताना भारतीय व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, “अमेरिकेला कमी दरात तांदूळ निर्यात केल्याचा कोणताही प्राथमिक पुरावा आढळलेला नाही. तसेच अमेरिकेने अद्याप भारताविरोधात कोणतीही चौकशी सुरू केली नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

https://agrowon.esakal.com/agro-special/india-rejects-donald-trumps-allegations-denies-exporting-rice-at-low-prices-ds98

माहिती शेअर करा