शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या व्यवहारावर भरावे लागणारे मुद्रांक शुल्क राज्य शासनाने आता माफ केले आहे. तसे आदेश महसूल विभागाने जारी केले आहेत. यासंदर्भातील महाराष्ट्र मुद्रांक कायद्यात (१९५८) केलेल्या दुरुस्तीबाबत नुकताच महसूल व वन विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी जारी केला.

‘‘शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीककर्जाशी संबंधित कार्यवाही केलेल्या अभिस्वीकृतीवर, रोखपत्र करारनाम्यावर किंवा हक्क विलेख निक्षेपपत्र, तसेच हडपपत्रावर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः माफ राहील,’’ असे सहसचिवांनी आदेशात म्हटले आहे.

१०० टक्के मुद्रांक शुल्क माफीची ही सवलत शेतकऱ्यांच्या दोन लाखांपर्यंतच्या तारण किंवा तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभूती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सूचनापत्र, घोषणापत्र किंवा त्यास संलग्न असलेल्या कोणत्याही कायदेशीर व्यवहाराला देखील लागू राहणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत मुद्रांक शुल्क माफी देण्याची शिफारस महसूल विभागाने दोन वर्षांपूर्वीच केली होती.

https://agrowon.esakal.com/agro-special/stamp-duty-waiver-for-farmers-on-transactions-up-to-rs-2-lakh-rat16

माहिती शेअर करा