कापूस आयातीवर गुरुवारपासून (ता.१) ११ टक्के आयातशुल्क लागू झाले आहे. याचा आधार बाजाराला मिळाला असून, काही ठिकाणी कापसाच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. कापसाला प्रति क्विंटल ७७०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. सरकारने आयातविषयक धोरण कायम ठेवले तर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सरकारने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले होते. अमेरिकेने भारताच्या कापड आयातीवर ५० टक्के शुल्क लागू केल्याने उद्योगांनी कापूस आयातीवरील शुल्क काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने १९ ऑगस्ट रोजी ३० सप्टेंबरपर्यंत ११ टक्के शुल्क काढले होते. त्यानंतर मुदतवाढ देऊन ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत शुल्क मुक्त आयातीला परवानगी दिली होती. त्याची मुदत आता संपली आहे. सरकारनेही मुदतवाढ देण्याविषयी कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे १ जानेवारीपासून आयात कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क लागू झाले आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/11-percent-duty-imposed-on-cotton-imports-rat16

माहिती शेअर करा