खानदेशात यंदा कांदेबाग किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लागवड केल्या जाणाऱ्या केळीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत लागवड केलेल्या केळीस यंदा व मागील दोन हंगामातही चांगले दर मिळाले आहेत यामुळे या कालावधीत केळीची लागवड वाढण्याचे संकेत आहेत.
खानदेशात अलिकडे बारमाही केळी लागवड केळी जाते. परंतु प्रमुख दोन बहरात केळी पिकाची लागवड करण्याचा प्रघातही खानदेशात आहे त्यात मृग बहर केळीचे पीक अधिक असते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा