राज्यभरात विविध भागांत झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान आहे. द्राक्ष उत्पादक पट्ट्याला मोठा तडाखा बसला आहे. नाशिक, सांगली विभागांत झालेल्या पावसामुळे छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव आहे. तर घड कमी व कमकुवत निघण्यासह जिरणे, गोळी घड, कोवळ्या फुटींचे नुकसान आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
द्राक्ष बागायतदार संघाच्या माहितीनुसार राज्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड आहे. या वार्षिक फळपिकांच्या उत्पादनासाठी गोडी बहार छाटणी कामकाजाला गती आली आहे. द्राक्ष उत्पादक पट्यात ५० टक्के छाटणी झालेली आहे मात्र परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांची हानी झाली आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा