पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व निर्विष्ठामध्ये पाणी आणि खते या दोन अत्यंत महत्वाच्या निर्विष्ठा आहेत. दोन्ही निर्विष्ठाचा पारंपरिक पद्धतीने वापर करीत असताना त्याची कार्यक्षमता फक्त ३० ते ४० टक्के मिळते. दोन्ही निर्विष्ठांचा ठिबक सिंचन पद्धतीमधून वापर केल्याने त्याची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते. त्यामुळे पिकाचे अधिक उत्पादन मिळतेच आणि उच्चतम गुणवत्ता मिळते त्याचबरोबर दोन्ही निर्विष्ठांच्या वापराने अनुक्रमे ५० ते ६० व २५ ते ३० टक्के होऊन खर्चामध्ये बचत होते.
विद्राव्य खतांच्या मात्रा ठरवण्यापूर्वी माती परीक्षण होणे आवश्यक आहे. आपल्या जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये किती आहेत हे लक्षात येते. त्यानुसार विद्राव्य खतांची मात्रा ठरविता येते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा