‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेने राज्यातील शेतीत मोठा बदल झाला आहे. याचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.शेतकऱ्यांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नसून, घरबसल्या एका क्लिकवर आपल्या तक्रारींचे निवारण करता येणार आहे.

सौर कृषी पंप बसवताना विलंब होत असेल किंवा सुरू असलेल्या पंपात तांत्रिक बिघाड झाला असेल, तर आता थेट ऑनलाइन दाद मागता येईल. महावितरणने यासाठी विशेष ‘तक्रार निवारण पोर्टल’ सज्ज केले असून आहे. तक्रारीचा मागोवा (स्टेटस ट्रॅकिंग) घेण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. तक्रार नोंदविण्यासाठी सर्वप्रथम महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.

https://agrowon.esakal.com/agro-special/mahavitarans-digital-initiative-for-complaints-about-solar-agricultural-pumps-rat16

माहिती शेअर करा