गहू, हरभरा या पिकांना ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील बहुतेक गावांमधील शेतकरी हे ड्रोन मशीनद्वारे गहू हरभरा व इतर पिकांना फवारणी करताना दिसून येत आहे.दरम्यान पंपाने फवारणी केली असता एका एकरला बाराशे ते तेराशे रुपये खर्च येतो.

तर यामध्ये वेळ व औषधेही खूप जातात. परंतु ड्रोन मशीनद्वारे तणनाशक फवारणी केली असता एकरी फक्त आठशे रुपये घेतात. तर तीन एकर क्षेत्र असले तर त्याचे एक हजार रुपये घेतले जातात. ड्रोनद्वारे सोयाबिन, बाजरी, मूग, उडीद, गहू, हरभरा, तूर तसेच ऊस,मका व सर्व प्रकारच्या पिकांना फवारणी करता येते. विशेष करून ज्या शेतकऱ्यांचा ऊस वाढलेला आहे व उसाला मावटा झाला असल्यास या मशीनद्वारे वरुन चांगल्या प्रकारे औषध करता येते.

https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-opt-for-drone-spraying-in-wheat-and-chickpea-crops-sai29

माहिती शेअर करा