राज्यातील कोरडवाहू शेतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ११ कोटी ८१ लाख रुपयांचा दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्र व राज्य यांच्या मार्फत हा निधी आयुक्तांना (कृषी) देण्यात आला आहे. हा निधी सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गांमध्ये वाटप होणार आहे. लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

मुख्य सचिवांच्या बैठकीत २८.२२ कोटींच्या आराखड्याला मंजुरी… ही योजना सन २०२२-२३ पासून राबवली जात आहे. यावर्षीच्या निधीला २४ मार्च २०२४ रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या आराखड्यानुसार केंद्राचा १६ कोटी ३९ लाख रुपये आणि राज्याचा ११ कोटी २८ लाख रुपये असा मिळून २८ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये शासन निर्णयाद्वारे या आराखड्याला शासकीय मान्यता देण्यात आली.

दुसऱ्या हप्त्यात एकूण १४.१० कोटींचा निधी उपलब्ध… पहिल्या हप्त्यात १४ कोटी ११ लाख रुपये वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर केंद्राकडून दुसऱ्या हप्त्यात ८ कोटी ४६ लाख रुपये देण्यात आले. त्यासाठी राज्याचा ५ कोटी ६४ लाख रुपये हिस्सा मिळून एकूण १४ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला.सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९ कोटी ३७ लाख रुपये देण्यात आले आहेत. अनुसूचित जातींसाठी १ कोटी ४२ लाख रुपये, तर अनुसूचित जमातींसाठी १ कोटी १ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/1181-crore-second-installment-released-for-dryland-farming-sai29

माहिती शेअर करा