अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी जिल्ह्याला आतापर्यंत १५७९ कोटी ३७ लाख रुपये मंजूर आहेत. आता केवळ खरडून गेलेल्या जमिनीचा व ऑगस्ट महिन्यातील दोन हेक्टरवरील क्षेत्राची रक्कम मंजूर आहे. दरम्यान, आतापर्यंत ४०९ कोटी २० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याचे सांगण्यात आले.
ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. सप्टेंबर महिन्यात तर जिल्ह्यात उच्चांकी पाऊस पडला. कोणतेही मंडल अथवा मंडळातील गाव नुकसानीपासून वाचू शकले नाही. पावसाळा संपल्यानंतर पीक नुकसानीची दाहकता समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात बीड, धाराशिव व अहिल्यानगर जिल्ह्यात पडलेल्या अति पावसाने जिल्ह्यातील सीना व इतर नद्यांना आलेल्या पुराची झळ संपूर्ण पिकांना बसली.