राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतीचे महत्व वाढत आहे. पूर्वी कर्नाटकातील रामनगर हीच रेशीम कोष विक्रीसाठी महत्वाची बाजारपेठ होती. अलीकडील काळात मात्र राज्यातच बाजारपेठ तयार होऊ लागल्याने शेतकऱयांची गैरसोय कमी झाली आहे. आता तर बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ऑनलाइन पद्धतीची रेशीम कोष बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाली आहे.

नागपूर येथील रेशीम संचालनालयाने १९ जानेवारी २०१९ रोजी त्यास मान्यता दिली. तर सप्टेंबर २०२२ पासून प्रायोगिक स्थरावर ‘ई-नाम ऑनलाइन प्लॅटफॉर्म’ कार्यान्वित झाला. कोष विक्रीसाठी या प्रणालीचा वापर करणारी बारामती हि देशातील पहिलीच बाजारपेठ ठरली आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा