खानदेशात दर पाडून केळीची खरेदी जोमात सुरू झाली आहे. बाजार समित्या दर जाहीर करीत आहेत. परंतु जाहीर दरात केळीची खरेदी होत आहे की नाही, शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे का, याची चौकशी, कारवाई मात्र बाजार समित्या करीत नसल्याची स्थिती खानदेशात आहे. केळीची कमी दरात खरेदी यंदा मागील अनेक महिने सुरू आहे. शेतकरी अडचणीत आले आहेत. वारंवार या बाबत तक्रारी करण्यात आल्या. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा व जळगाव या बाजार समित्या केळीचे दर जाहीर करतात. या बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात केळी पीक अधिक आहे. तसेच या बाजार समित्या केळी खरेदीसंबंधी परवाना वितरण, त्यांचे नूतनीकरण, विपणन, सेस वसुली ही कार्यवाही करतात. परंतु या बाजार समित्या फक्त सेस वसुली किंवा बाजार शुल्क वसुली करतात.

केळीचे जे दर जाहीर होतात, त्या दरात केळीची खरेदी होत आहे की नाही, या बाबत चौकशी, तपासणी केली जात नाही. सध्या केळीचे दर ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल जाहीर केले जात आहेत. परंतु खरेदी या दरांपेक्षा कमी दरात सर्रास केली जात आहे. अनेक खरेदीदार केळीला फक्त ६०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलचा दर देत आहेत. तर काही खरेदीदार सरसकट ८५० रुपये प्रति क्विंटलचा दर देत आहेत.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/banana-farmers-in-khandesh-hit-by-low-prices-amid-market-negligence-rat16

माहिती शेअर करा