द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकसह (Nashik) राज्यभरातील द्राक्ष बागांच्या (Grape Farm) संख्येत घट होत आहे. नोटबंदीपासून विविध कारणांनी द्राक्ष बागांना फटका बसण्यास सुरुवात झाली. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत जातोय, त्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करताकरता खचलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी (Grape Farmers) द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच वर्षात साधारणतः 50 हजार क्षेत्रावरील द्राक्षबागा नष्ट झाल्या आहेत.
राज्यात चार ते साडेचार लाख एकरावर द्राक्षबागा आहेत. त्यातून जवळपास तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र निर्यात धोरण, GST सारख्या कराची आकारणी, मजुरांचा तुटवडा, व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, हमीभाव नसणे, अवकाळी पाऊस, गारपीट अशा एका पाठोपाठ एक येणाऱ्या संकटाच्या मालिकांमुळे युरोप, बांगलादेश, रशियासह जगाच्या वेगवेगळ्या भागात गोडवा पोचविणाऱ्या द्राक्ष बागाच्या संख्येत घट होत आहे. नाशिकसह सांगली, सोलापूर, बारामती, इंदापूर, पुणे या भागातील द्राक्षबागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकारने वेळीच लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा