सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी करण्यास फारशी गती नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून ६ हजार ५८९ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाची टंचाई असल्याने निर्यातही उशिरा सुरू होईल, असा प्राथमिक अंदाज द्राक्ष संघाने व्यक्त केला आहे. यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात लांबणीवर पडेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे. दरवर्षी खानापूर, तासगाव या तालुक्यांतून सर्वाधिक शेतकरी निर्यातीसाठी पुढाकार घेतात. मात्र यंदा नोंदणीला प्रतिसाद कमी आहे.

जिल्ह्यातून गतवर्षी १० हजार १६५ शेतकऱ्यांनी युरोपियन देशांसह आखाती देशांत १७ हजार ८९७ टन द्राक्षाची निर्यात केली होती. यात तासगाव आणि खानापूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांचा सर्वाधिक समावेश होता. यंदा जिल्ह्यातून गतवर्षी इतक्या द्राक्ष निर्यातीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.त्यासाठी निर्यात करण्याऱ्यांची संख्या वाढावी यासाठी जनजागृतीही केली. मात्र यंदा अतिवृष्टीचा फटका बसल्याने द्राक्ष पीक धोक्यात आले. त्यामुळे द्राक्ष निर्यात करणाऱ्यांची संख्याही कमी झाली. यंदा ५ हजार ८५ शेतकऱ्यांनी परवाने नुतनीकरण केले तर १५०२ शेतकऱ्यांनी नवीन परवान्यासाठी नोंदणी केली. यात सर्वाधिक नोंदणी जतमधून झाली.

https://agrowon.esakal.com/agro-special/registration-for-grape-export-will-decrease-rat16

माहिती शेअर करा