नाशिक जिल्ह्यात कसमादे भागात द्राक्ष उत्पादक गेल्या दोन दशकांपासून जोखीम घेऊन पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेत आहेत. यंदाच्या हंगामात द्राक्षमालाचे खुडे मागील सप्ताहात सुरु झाले. त्यास प्रतिकिलो १२० ते १३० रुपये दरम्यान दर मिळाला. काढणीपश्चात या द्राक्षांची निर्यात सुरु झाली असून पहिले दोन कंटेनर रशियासाठी रवाना झाले आहेत.
दक्षिण आशियायी देशांमध्ये सर्वात पहिल्यांदा गोडी बहार फळ छाटणी घेऊन कसमादे भागात प्रामुख्याने सटाणा तालुक्यात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. येथे ऑक्टोबर पासून खुडे सुरु होतात.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा